Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे व्लादिवोस्तोक येथे आयोजित 6व्या पूर्व आर्थिक मंच 2021 शिखर परिषदेत आभासी माध्यमातून केलेले भाषण

पंतप्रधानांचे व्लादिवोस्तोक येथे आयोजित 6व्या पूर्व आर्थिक मंच 2021 शिखर परिषदेत आभासी माध्यमातून केलेले भाषण


नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2021

 

व्लादिवोस्तोक येथे 3 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित 6 व्या पूर्व आर्थिक मंचाच्या  (ईईएफ)  शिखर परिषदेच्या  पूर्ण सत्राला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यापूर्वी पंतप्रधान 2019 मध्ये 5 व्या पूर्व आर्थिक मंचाच्या बैठकीत  मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले होते आणि या परिषदेत सहभागी होणारे ते  पहिले भारतीय पंतप्रधान होते.

रशियाच्या अती पूर्वेच्या भागाच्या विकासासाठी अध्यक्ष पुतीन यांच्या दूरदर्शीपणाची प्रशंसा करत पंतप्रधानांनी यासंदर्भात रशियाचा विश्वासार्ह भागीदार असण्याच्या “अॅक्ट ईस्ट पॉलिसी” चा भाग म्हणून भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.त्यांनी रशियाच्या अती पूर्वेच्या  विकासात भारत आणि रशियाची नैसर्गिक पूरकता अधोरेखित केली.

पंतप्रधानांनी ‘विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी’च्या अनुषंगाने दोन्ही बाजूंच्या अधिकाधिक आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारीच्या महत्त्वावर भर दिला. महामारीच्या काळात उदयाला आलेले सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र म्हणून त्यांनी आरोग्य आणि औषधनिर्माण  क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. हिरे, कोळसा, स्टील, लाकूड इत्यादींसह आर्थिक सहकार्याच्या इतर संभाव्य क्षेत्रांचाही त्यांनी उल्लेख केला.

पूर्व आर्थिक मंचाच्या  2019 मधील शिखर परिषदेदरम्यान भारतीय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या भेटीची आठवण करून देत पंतप्रधानांनी अती पूर्वेच्या 11 रशियन क्षेत्रांच्या राज्यपालांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.

कोविड -19 महामारीचे आव्हान असूनही, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांच्या नेतृत्वाखालील ,प्रमुख भारतीय तेल आणि वायू कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेलेले भारतीय शिष्टमंडळ, पूर्व आर्थिक मंचाच्या चौकटीत भारत-रशिया व्यवसाय संवादात भाग घेत आहेत.

पूर्व आर्थिक मंच शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रूपाणी आणि रशियाच्या साखा-याकुटिया प्रांताचे राज्यपाल यांच्यात 2 सप्टेंबर रोजी ऑनलाइन बैठक झाली.विविध क्षेत्रांतील नामांकित भारतीय कंपन्यांचे 50 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत ऑनलाईन माध्यमातून  सहभागी होतील.

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com